समर्थ दिनदर्शिकातुमच्या स्थानानुसार मराठी पंचांग

आरती संग्रह

Devotional Collection — आरती, मंत्र, श्लोक व स्तोत्रे

श्री गणपती

सुखकर्ता दुःखहर्ता · आरती

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची । सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥ १ ॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ धृ ॥ रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुंकुमकेशरा । हिरेजडित मुकुट शोभतो बरा । रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया ॥ २ ॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ धृ ॥ लंबोदर पीतांबर फणिवरबंधना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना । दास रामाचा वाट पाहे सदना । संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ॥ ३ ॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ धृ ॥

गणेश वंदना (वक्रतुण्ड महाकाय) · श्लोक

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥

श्री गणपती अथर्वशीर्ष · स्तोत्र

ॐ नमस्ते गणपतये । त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि । त्वमेव केवलं कर्ताऽसि । त्वमेव केवलं धर्ताऽसि । त्वमेव केवलं हर्ताऽसि । त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि । त्वं साक्षादात्मासि नित्यं ॥ १ ॥ ऋतं वच्मि । सत्यं वच्मि ॥ २ ॥ अव त्वं माम् । अव वक्तारम् । अव श्रोतारम् । अव दातारम् । अव धातारम् । अवानूचानमव शिष्यम् । अव पश्चात्तात् । अव पुरस्तात् । अवोत्तरात्तात् । अव दक्षिणात्तात् । अव चोर्ध्वात्तात् । अवाधरात्तात् । सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् ॥ ३ ॥ त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः । त्वं आनंदमयस्त्वं ब्रह्ममयः । त्वं सच्चिदानंदाद्वितीयोऽसि । त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि । त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि ॥ ४ ॥ सर्वं जगदिदं त्वत्तो जायते । सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति । सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति । सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति । त्वं भूमिरापोनलोऽनिलो नभः । त्वं चत्वारि वाक्पदानि ॥ ५ ॥ त्वं गुणत्रयातीतः । त्वं देहत्रयातीतः । त्वं अवस्थात्रयातीतः । त्वं कालत्रयातीतः । त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं । त्वं शक्तित्रयात्मकः । त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं । त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवःस्वरोम् ॥ ६ ॥ गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् । अनुस्वारः परतरः । अर्धेन्दुलसितम् । तारेण ऋद्धम् । एतत्तव मनुस्वरूपम् । गकारः पूर्वरूपम् । अकारो मध्यमरूपम् । अनुस्वारश्चान्त्यरूपम् । बिंदुरुत्तररूपम् । नाद संधानम् । संहिता संधिः । सैषा गणेशविद्या । गणक ऋषिः । निचृद्गायत्री छंदः । गणपतिर्देवता । ॐ गं गणपतये नमः ॥ ७ ॥ ॐ एकदंताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि । तन्नो दंती प्रचोदयात् ॥ ८ ॥ एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणम् । रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम् । रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम् । रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पैः सुपूजितम् । भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम् । आविर्भूतं च सृष्टयादौ प्रकृतेः पुरुषात्परम् । एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः ॥ ९ ॥ नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्तेऽस्तु लंबोदरायैकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तये नमः ॥ १० ॥ फलश्रुती: एतदथर्वशीर्षं योऽधीते । स ब्रह्मभूयाय कल्पते । स सर्वतः सुखमेधते । स सर्वविघ्नैर्न बाध्यते । स पंचमहापापात्प्रमुच्यते । सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति । प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति । सायं प्रातः प्रयुंजानोऽपापो भवति । सर्वत्राधीयानोऽपविघ्नो भवति । धर्मार्थकाम मोक्षं च विंदति । इदमथर्वशीर्षमशिष्याय न देयम् । यो यदि मोहाद्दास्यति स पापीयान् भवति । सहस्रावर्तनात् यं यं काममधीते तं तमनेन साधयेत् । अनेन गणपतिमभिषिंचति स वाग्मी भवति । चतुर्थ्यामनश्नन् जपति स विद्यावान् भवति । इत्यर्थवणवाक्यम् । ब्रह्माद्यावरणं विद्यात् । न बिभेति कदाचनेति । यो दुर्वांकुरैर्यजति स वैश्रवणोपमो भवति । यो लाजैर्यजति स यशोवान्भवति । यो मोदकसहस्रेण यजति स वांछितफलमवाप्नोति । यः साज्यसमिद्भिर्यजति स सर्वं लभते । स सर्वं लभते । अष्टौ ब्राह्मणान् सम्यग्ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति । सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासंनिधौ वा जप्त्वा सिद्धमंत्रो भवति । महाविघ्नात्प्रमुच्यते । महादोषात् प्रमुच्यते । महापापात्प्रमुच्यते । स सर्वविद् भवति स सर्वविद् भवति य एवं वेद । इत्युपनिषत् ॥ शान्तिमंत्र: ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः । स्थिरैरंगैस्तुष्टुवांस्तनुभिर्व्यशेमदेवहितं यदायुः ॥ ॐ स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः । स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः । स्वस्तिनस्ताक्ष्यों अरिष्टनेमिः । स्वस्तिनो वृहस्पतिर्दधातु ॥ ॐ सहनाववतु । सहनौ भुनक्तु । सहवीर्यं करवावहै । तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॥ ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥

श्री विठ्ठल

युगे अठ्ठावीस · आरती

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा । पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा । चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥ १ ॥ जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥ धृ ॥ तुळसीमाळा गळा कर ठेवुनि कटी । कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी । देव सुरवर नित्य येती भेटी । गरुड हनुमंत पुढे उभे रहाती ॥ २ ॥ जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥ धृ ॥ धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा । सुवर्णाची कमळे वनमाळा गळा । राई रखुमाबाई राणीया सकळा । ओवाळीती राजा विठोबा सावळा ॥ ३ ॥ जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥ धृ ॥ ओवाळू आरत्या कुरवंड्या येती । चंद्रभागेमाजी सोडुनिया देती । दिंड्या पताका वैष्णव नाचती । पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥ ४ ॥ जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥ धृ ॥ आषाढी कार्तिकी भक्तजन येती । चंद्रभागेमध्ये स्नाने जे करिती । दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ती । केशवासी नामदेव भावे ओवाळीती ॥ ५ ॥ जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥ धृ ॥

पसायदान · स्तोत्र

॥ पसायदान ॥ आता विश्वात्मके देवे । येणे वाग्यज्ञे तोषावे । तोषोनि मज द्यावे । पसायदान हे ॥१॥ जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जीवांचे ॥२॥ दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्ये पाहो । जो जे वांछील तो ते लाहो । प्राणिजात ॥३॥ वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥४॥ चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचे गाव । बोलती जे अर्णव । पीयूषांचे ॥५॥ चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥६॥ किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिहीं लोकी । भजिजो आदिपुरुषीं । अखंडित ॥७॥ आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इये । दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥८॥ येथ म्हणे ज्ञानदेवो । हा होईल दान पसावो । येणे वरे ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥९॥

संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ · स्तोत्र

॥ १ ॥ देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥ हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा।पुण्याची गणना कोण करी ॥२॥ असोनि संसारीं जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥ ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवांघरीं ॥४॥ ॥ २ ॥ चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥१॥ मंथुनी नवनीता तैसें घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्गु ॥२॥ एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमा न घाली मन ॥३॥ ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥ ॥ ३ ॥ त्रिगुण असार निर्गुण हें सार । सारासार विचार हरिपाठ ॥१॥ सगुण निर्गुण गुणाचें अगुण । हरिवीणें मन व्यर्थ जाय ॥२॥ अव्यक्त निराकार नाहीं ज्या आकार । जेथुनि चराचर हरिसी भजें ॥३॥ ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । अनंत जन्मांनी पुण्य होय ॥४॥ ॥ ४ ॥ भावेंवीण भक्ति भक्तिविण मुक्ति । बळेंवीण शक्ति बोलु नये ॥१॥ कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहें निवांत शिणसी वायां ॥२॥ सायासें करिसी प्रपंच दिननिशीं । हरिसी न भजसी कवण्या गुणें ॥३॥ ज्ञानदेव म्हणें हरिजप करणें । तुटेल धरणें प्रपंचाचें ॥४॥ ॥ ५ ॥ योगयागविधि येणें नोहे सिद्धी । वायांचि उपाधि दंभ धर्म ॥१॥ भावेंविण देव न कळे नि:संदेह । गुरुविण अनुभव कैसा कळे ॥२॥ तपेंवीण दैवत दिधल्याविण प्राप्त । गुजेंविण हित कोण सांगे ॥३॥ ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात । साधूचे संगती तरणोपाय ॥४॥ ॥ ६ ॥ साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला । ठायींच मुराला अनुभवें ॥१॥ कापुराची वाती उजळली ज्योति । ठायींच समाप्ति झाली जैसी ॥२॥ मोक्षरेखे आला भाग्यें विनटला । साधूंचा अंकिला हरिभक्त ॥३॥ ज्ञानदेवा गोडी संगति सज्जनीं । हरि दिसे जनीं वनी आत्मतत्वीं ॥४॥ ॥ ७ ॥ पर्वताप्रमाणे पातक करणें । वज्रलेप होणें अभक्तासी ॥१॥ नाहीं ज्यांसी भक्ति ते पतित अभक्त । हरिसी न भजत दैवहत ॥२॥ अनंत वाचाळ बरळती बरळ । त्यां कैंचा दयाळ पावे हरि ॥३॥ ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान । सर्वांघटीं पूर्ण एक नांदे ॥४॥ ॥ ८ ॥ संतांचे संगतीं मनोमार्ग गति । आकळावा श्रीपति येणें पंथें ॥१॥ रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा । आत्मा जो शिवाचा राम जप ॥२॥ एकतत्व नाम साधिती साधन । द्वैताचें बंधन न बाधिजे ॥३॥ नामामृत गोडी वैष्णवां लाधली । योगियां साधली जीवनकळा ॥४॥ सत्वर उच्चार प्रल्हादीं बिंबला । उद्धवा लाधला कृष्णदाता ॥५॥ ज्ञानदेव म्हणे नाम हें सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥६॥ ॥ ९ ॥ विष्णुविण जप व्यर्थ त्याचें ज्ञान । रामकृष्णीं मन नाहीं ज्याचें ॥१॥ उपजोनी करंटा नेणें अद्वय वाटा । रामकृष्णीं पैठा कैसेनी होय ॥२॥ द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान । तया कैचें कीर्तन घडे नामीं ॥३॥ ज्ञानदेव म्हणे सगुण हें ध्यान । नामपाठ मौन प्रपंचाचे ॥४॥ ॥ १० ॥ त्रिवेणीसंगमीं नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं नामीं तरी तें व्यर्थ ॥१॥ नामासी विन्मुख तो नर पापिया । हरिवीण धांवया न पावे कोणी ॥२॥ पुराणप्रसिद्ध बोलिले वाल्मीक । नामें तीन्ही लोक उद्धरती ॥३॥ ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचें । परंपरा त्याचें कुळ शुद्ध ॥४॥ ॥ ११ ॥ हरि उच्चारणीं अनंत पापराशी । जातील लयासी क्षणमात्रे ॥१॥ तृण अग्निमेळें समरस झालें । तैसें नामें केलें जपतां हरि ॥२॥ हरि उच्चारण मंत्र पै अगाध । पळे भूतबाधा भेणे तेथें ॥३॥ ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ । न करवे अर्थ उपनिषदां ॥४॥ ॥ १२ ॥ तीर्थ व्रत नेम भावेंविण सिद्धि । वायांचि उपाधि करिसी जनां ॥१॥ भावबळें आकळे येऱ्हवीं नाकळे । करतळीं आंवळे तैसा हरि ॥२॥ पारियाचा रवा घेतां भूमिवरी । यत्न परोपरी साधन तैसें ॥३॥ ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण । दिधलें संपूर्ण माझे हातीं ॥४॥ ॥ १३ ॥ समाधि हरिची सम सुखेंवीण । न साधेल जाण द्वैतबुद्धि ॥१॥ बुद्धीचें वैभव अन्य नाहीं दुजें । एका केशवराजें सकळ सिद्धि ॥२॥ ऋद्धि सिद्धि निधी अवघीच उपाधि । जंव त्या परमानंदीं मन नाहीं ॥३॥ ज्ञानदेवी रम्य रमलें समाधान । हरिचें चिंतन सर्वकाळ ॥४॥ ॥ १४ ॥ नित्य सत्य मित हरिपाठ ज्यासी । कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी ॥१॥ रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप । पापाचे कळप पळती पुढें ॥२॥ हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा । म्हणती जे वाचा तयां मोक्ष ॥३॥ ज्ञानदेवा पाठ नारायण नाम । पाविजे उत्तम निजस्थान ॥४॥ ॥ १५ ॥ एक नाम हरि द्वैतनाम दुरी । अद्वैत कुसरी विरळा जाणें ॥१॥ समबुद्धि घेतां समान श्रीहरि । शमदमांवरी हरि झाला ॥२॥ सर्वांघटीं राम देहांदेहीं एक । सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी ॥३॥ ज्ञानदेवा चित्तीं हरिपाठ नेमा । मागिलिया जन्मा मुक्त झालों ॥४॥ ॥ १६ ॥ हरिनाम जपे तो नर दुर्लभ । वाचेसी सुलभ रामकृष्ण ॥१॥ राम कृष्ण नामीं उन्मनी साधली । तयासी लाधली सकळ सिद्धी ॥२॥ सिद्धि बुद्धि धर्म हरिपाठीं आले । प्रपंची निवाले साधुसंगे ॥३॥ ज्ञानदेवा नाम रामकृष्ण ठसा । येणें दशदिशा आत्माराम ॥४॥ ॥ १७ ॥ हरिपाठकीर्ति मुखें जरी गाय । पवित्रचि होय देह त्याचा ॥१॥ तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप । चिरंजीव कल्पकोटि वैकुंठीं नांदे ॥२॥ मातृपितृभ्राता सगोत्र अपार । चतुर्भुज नर हो‌ऊनि ठेले ॥३॥ ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधलें । निवृत्तीनें दिधले माझे हातीं ॥४॥ ॥ १८ ॥ हरिवंशपुराण हरिनाम संकीर्तन । हरिविण सौजन्य नेणें कांहीं ॥१॥ त्या नरा लाधलें वैकुंठ जोडलें । सकळ घडलें तीर्थाटन ॥२॥ मनोमार्गें गेला तो तेथे मुकला । हरिपाठीं स्थिरावला तोचि धन्य ॥३॥ ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी । रामकृष्णीं आवडि सर्वकाळ ॥४॥ ॥ १९ ॥ नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी । पापे अनंत कोटी गेली त्यांची ॥१॥ अनंत जन्मांचे तप एक नाम । सुगम हरिपाठ ॥२॥ योग याग क्रिया धर्माधर्म माया । गेले ते विलया हरिपाठीं ॥३॥ ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म । हरिविण नेम नाहीं दुजा ॥४॥ ॥ २० ॥ वेदशास्त्रपुराण श्रुतिचे वचन । एक नारायण सार जप ॥१॥ जप तप कर्म हरिविण धर्म । वा‌उगाचि श्रम व्यर्थ जाय ॥२॥ हरिपाठीं गेले ते निवांतचि ठेले । भ्रमर गुंतले सुमनकळिके ॥३॥ ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र । यमें कुळगोत्र वर्जियेले ॥४॥ ॥ २१ ॥ काळ वेळ नाम उच्चारितां नाही । दोन्ही पक्ष पाहीं उद्धरती ॥१॥ रामकृष्ण नाम सर्व दोषां हरण । जडजीवां तारण हरि एक ॥२॥ हरिनाम सार जिव्हा या नामाची । उपमा त्या देवाची कोण वानी ॥३॥ ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ । पूर्वजां वैकुंठ-मार्ग सोपा ॥४॥ ॥ २२ ॥ नित्यनेम नामीं ते प्राणी दुर्लभ । लक्ष्मीवल्लभ तयां जवळी ॥१॥ नारायण हरि नारायण हरि । भुक्ति मुक्ति चारी घरीं त्यांच्या ॥२॥ हरिविण जन्म तो नरकचि पैं जाणा । यमाचा पाहुणा प्राणि होय ॥३॥ ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड । गगनाहुनि वाड नाम आहे ॥४॥ ॥ २३ ॥ सात पांच तीन दशकांचा मेळा । एक तत्त्वीं कळा दावी हरि ॥१॥ तैसें नव्हे नाम सर्वत्र वरीष्ठ । तेथें कांहीं कष्ट न लागती ॥२॥ अजपा जपणें उलट प्राणाचा । तेथेंहि मनाचा निर्धार असे ॥३॥ ज्ञानदेवा जिणें नामेंविण व्यर्थ । रामकृष्णीं पंथ क्रमियेला ॥४॥ ॥ २४ ॥ जप तप कर्म क्रिया नेम धर्म । सर्वांघटीं राम भाव शुद्ध ॥१॥ न सोडी हा भावो टाकी रे संदेहो । रामकृष्ण टाहो नित्य फोडी ॥२॥ जाति वित्त गोत कुलशील मात । भजकां त्वरीत भावयुक्त ॥३॥ ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । वैकुंठभुवनी घर केलें ॥४॥ ॥ २५ ॥ जाणीव नेणीव भगवंतीं नाहीं । हरि‌उच्चारणीं पाही मोक्ष सदां ॥१॥ नारायण हरि उच्चार नामाचा । तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥२॥ तेथील प्रमाण नेणवें वेदांसी । तें जीवजंतूंसी केंवी कळे ॥३॥ ज्ञानदेवा फळ नारायण पाठ । सर्वत्र वैकुंठ केलें असे ॥४॥ ॥ २६ ॥ एक तत्व नाम दृढ धरीं मना । हरीसी करुणा ये‌ईल तुझी ॥१॥ तें नाम सोपें रे राम-कृष्ण गोविंद । वाचेसी सद्गद जपा आधीं ॥२॥ नामापरतें तत्त्व नाहीं रे अन्यथा । वायां आणिका पंथा जाशील झणीं ॥३॥ ज्ञानदेवा मौन जप माळ अंतरी । धरोनी श्रीहरि जपे सदां ॥४॥ ॥ २७ ॥ सर्व सुख गोडी साही शास्त्रें निवडी । रिकामा अर्धघडी राहूं नको ॥१॥ लटिका व्यवहार सर्व हा संसार । वायां येरझार हरिवीण ॥२॥ नाम मंत्र जप कोटी जा‌ईल पाप । रामकृष्णीं संकल्प धरुनि राहें ॥३॥ निजवृत्ति हे काढी सर्व माया तोडी । इंद्रियां सवडी लपू नको ॥४॥ तीर्थी व्रतीं भाव धरी रे करुणा । शांति दया पाहुणा हरि करी ॥५॥ ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तिदेवीं ज्ञान । समाधि संजीवन हरिपाठ ॥६॥ ॥ २८ ॥ अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस । रचिले विश्वासें ज्ञानदेवें ॥१॥ नित्य पाठ करी इंद्रायणीतीरीं । होय अधिकारी सर्वथा तो ॥२॥ असावें एकाग्रीं स्वस्थ चित्त मनीं । उल्हासेंकरूनी स्मरण जीवी ॥३॥ अंतकाळी तैसा संकटाचे वेळीं । हरि त्या सांभाळी अंतर्बाह्य ॥४॥ संतसज्जनांनी घेतली प्रचीति । आळसी मंदमति केवीं तरे ॥५॥ श्रीगुरु-निवृत्तिवचन तें प्रेमळ । तोषला तात्काळ ज्ञानदेव ॥६॥

काकड आरती · आरती

उठा पांडुरंगा आता, दर्शन द्या सकळा । झाला अरुणोदय, सरली निद्रेची वेळा ॥ संत साधू मुनी अवघे, झालेती गोळा । सोडा शेजसुख आता, पाहू द्या मुखकमळा ॥ रंगमंडपी महाद्वारी, झालीसे दाटी । मन उतावेळ, रूप पहावया दृष्टी ॥ राई रखुमाबाई, तुम्हा येऊ द्या द्या । शेजे हालवुनी जागे करा देवराया ॥ गरुड हनुमंत, उभे पाहती वाट । स्वर्गीचे सुरवर घेऊनि आले बोभाट ॥ झाले मुक्तद्वार, लाभ झाला रोकडा । विष्णुदास नामा उभा घेऊनी काकडा ॥

श्री देवी

दुर्गे दुर्घट भारी · आरती

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी । अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी । वारी वारी जन्ममरणाते वारी । हारी पडलो आता संकट निवारी ॥ १ ॥ जय देवी जय देवी जय महिषासुरमथिनी । सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ ॥ त्रिभुवनी भुवनी पाहता तुजऐसी नाही । चारी श्रमले परंतु न बोलवे काही । साही विवाद करिता पडले प्रवाही । ते तू भक्तालागी पावसी लवलाही ॥ २ ॥ जय देवी जय देवी जय महिषासुरमथिनी । सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ ॥ प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा । क्लेशांपासुनी सोडवी तोडी भवपाशा । अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा । नरहरि तल्लीन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥ जय देवी जय देवी जय महिषासुरमथिनी । सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ ॥

श्री महिषासुरमर्दिनी स्तोत्र · स्तोत्र

अयि गिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दिनुते । गिरिवरविन्ध्यशिरोऽधिनिवासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते । भगवति हे शितिकण्ठकुटुम्बिनि भूरिकुटुम्बिनि भूरिकृते । जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १ ॥ सुरवरवर्षिणि दुर्धरधर्षिणि दुर्मुखमर्षिणि हर्षरते । त्रिभुवनपोषिणि शङ्करतोषिणि किल्बिषमोषिणि घोषरते । दनुजनिरोषिणि दितिसुतरोषिणि दुर्मदशोषिणि सिन्धुसुते । जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ २ ॥ अयि जगदम्ब मदम्ब कदम्ब वनप्रियवासिनि हासरते । शिखरि शिरोमणि तुङ्गहिमलय शृङ्गनिजालय मध्यगते । मधुमधुरे मधुकैटभगञ्जिनि कैटभभञ्जिनि रासरते । जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ३ ॥ अयि शतखण्ड विखण्डितरुण्ड वितुण्डितशुण्द गजाधिपते । रिपुगजगण्ड विदारणचण्ड पराक्रमशुण्ड मृगाधिपते । निजभुजदण्ड निपातितखण्ड विपातितमुण्ड भटाधिपते । जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ४ ॥ अयि रणदुर्मद शत्रुवधोदित दुर्धरनिर्जर शक्तिभृते । चतुरविचार धुरीणमहाशिव दूतकृत प्रमथाधिपते । दुरितदुरीह दुराशयदुर्मति दानवदुत कृतान्तमते । जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ५ ॥ अयि शरणागत वैरिवधुवर वीरवराभय दायकरे । त्रिभुवनमस्तक शुलविरोधि शिरोऽधिकृतामल शुलकरे । दुमिदुमितामर धुन्दुभिनादमहोमुखरीकृत दिङ्मकरे । जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ६ ॥ अयि निजहुङ्कृति मात्रनिराकृत धूम्रविलोचन धूम्रशते । समरविशोषित शोणितबीज समुद्भवशोणित बीजलते । शिवशिवशुम्भ निशुम्भमहाहव तर्पितभूत पिशाचरते । जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ७ ॥ धनुरनुषङ्ग रणक्षणसङ्ग परिस्फुरदङ्ग नटत्कटके । कनकपिशङ्ग पृषत्कनिषङ्ग रसद्भटशृङ्ग हताबटुके । कृतचतुरङ्ग बलक्षितिरङ्ग घटद्बहुरङ्ग रटद्बटुके । जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ८ ॥ सुरललना ततथेयि तथेयि कृताभिनयोदर नृत्यरते । कृत कुकुथः कुकुथो गडदादिकताल कुतूहल गानरते । धुधुकुट धुक्कुट धिंधिमित ध्वनि धीर मृदंग निनादरते । जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ९ ॥ जय जय जप्य जयेजयशब्द परस्तुति तत्परविश्वनुते । झणझणझिञ्झिमि झिङ्कृत नूपुरशिञ्जितमोहित भूतपते । नटित नटार्ध नटी नट नायक नाटितनाट्य सुगानरते । जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १० ॥ अयि सुमनःसुमनःसुमनः सुमनःसुमनोहरकान्तियुते । श्रितरजनी रजनीरजनी रजनीरजनी करवक्त्रवृते । सुनयनविभ्रमर भ्रमरभ्रमर भ्रमरभ्रमराधिपते । जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ११ ॥ सहितमहाहव मल्लमतल्लिक मल्लितरल्लक मल्लरते । विरचितवल्लिक पल्लिकमल्लिक झिल्लिकभिल्लिक वर्गवृते । शितकृतफुल्ल समुल्लसितारुण तल्लजपल्लव सल्ललिते । जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १२ ॥ अविरलगण्ड गलन्मदमेदुर मत्तमतङ्ग जराजपते । त्रिभुवनभुषण भूतकलानिधि रूपपयोनिधि राजसुते । अयि सुदतीजन लालसमानस मोहन मन्मथराजसुते । जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १३ ॥ कमलदलामल कोमलकान्ति कलाकलितामल भाललते । सकलविलास कलानिलयक्रम केलिचलत्कल हंसकुले । अलिकुलसङ्कुल कुवलयमण्डल मौलिमिलद्बकुलालिकुले । जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १४ ॥ करमुरलीरव वीजितकूजित लज्जितकोकिल मञ्जुमते । मिलितपुलिन्द मनोहरगुञ्जित रञ्जितशैल निकुञ्जगते । निजगणभूत महाशबरीगण सद्गुणसम्भृत केलितले । जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १५ ॥ कटितटपीत दुकूलविचित्र मयुखतिरस्कृत चन्द्ररुचे । प्रणतसुरासुर मौलिमणिस्फुर दंशुलसन्नख चन्द्ररुचे । जितकनकाचल मौलिमदोर्जित निर्भरकुञ्जर कुम्भकुचे । जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १६ ॥ विजितसहस्रकरैक सहस्रकरैक सहस्रकरैकनुते । कृतसुरतारक सङ्गरतारक सङ्गरतारक सूनुसुते । सुरथसमाधि समानसमाधि समाधिसमाधि सुजातरते । जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १७ ॥ पदकमलं करुणानिलये वरिवस्यति योऽनुदिनं सुशिवे । अयि कमले कमलानिलये कमलानिलयः स कथं न भवेत् । तव पदमेव परम्पदमित्यनुशीलयतो मम किं न शिवे । जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १८ ॥ कनकलसत्कलसिन्धुजलैरनुषिञ्चति तेगुणरङ्गभुवम् । भजति स किं न शचीकुचकुम्भतटीपरिरम्भसुखानुभवम् । तव चरणं शरणं करवाणि नतामरवाणि निवासि शिवम् । जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १९ ॥ तव विमलेन्दुकुलं वदनेन्दुमलं सकलं ननु कूलयते । किमु पुरुहूतपुरीन्दु मुखी सुमुखीभिरसौ विमुखीक्रियते । मम तु मतं शिवनामधने भवती कृपया किमुत क्रियते । जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ २० ॥ अयि मयि दीन दयालुतया कृपयैव त्वया भवितव्यमुमे । अयि जगतो जननी कृपयासि यथासि तथानुमितासिरते । यदुचितमत्र भवत्युररीकुरुतादुरुतापमपाकुरुते । जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ २१ ॥

श्री शंकर

लवथवती विक्राळा · आरती

लवथवती विक्राळा ब्रह्माण्डी माळा । वीषे कण्ठ काळा त्रिनेत्री ज्वाळा । लावण्य सुन्दर मस्तकी बाळा । तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ॥ १ ॥ जय देव जय देव जय श्रीशंकरा । आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ॥ धृ ॥ कर्पुर्गौरा भोळा नयनी विशाळा । अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा । विभुतीचे उधळण शितिकण्ठ नीळा । ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ २ ॥ जय देव जय देव जय श्रीशंकरा । आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ॥ धृ ॥ देवी दैत्यी सागरमन्थन पै केलें । त्यामाजी अवचित हळाहळ जें उठिले । ते त्वां असुरपणे प्राशन केलें । नीलकण्ठ नाम प्रसिद्ध झालें ॥ ३ ॥ जय देव जय देव जय श्रीशंकरा । आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ॥ धृ ॥ व्याघ्राम्बर फणिवरधर सुन्दर मदनारी । पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी । शतकोटीचें बीज वाचे उच्चारी । रघुकुळटिळक रामदासा अन्तरी ॥ ४ ॥ जय देव जय देव जय श्रीशंकरा । आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ॥ धृ ॥

महामृत्युंजय मंत्र · मंत्र

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् । उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥

श्री मारुती

सत्राणे उड्डाणे · आरती

सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं । करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं । कडाडिलें ब्रह्मांड धाके त्रिभुवनीं । सुरवर नर निशाचर त्यां झाल्या पळणी ॥ १ ॥ जय देव जय देव जय जय हनुमंता । तुमचेनि प्रतापे न भिये कृतान्ता ॥ धृ ॥ दुमदुमिले पाताळ उठला प्रतिशब्द । धगधगिला धरणीधर मानिला खेद । कडाडिले पर्वत उडुगण उच्छेद । रामीं रामदासा शक्तीचा शोध ॥ २ ॥ जय देव जय देव जय जय हनुमंता । तुमचेनि प्रतापे न भिये कृतान्ता ॥ धृ ॥

श्री हनुमान चालीसा · स्तोत्र

॥ दोहा ॥ श्रीगुरु चरन सरोज रज निज मनु मुकुरु सुधारि । बरनउँ रघुबर बिमल जसु जो दायकु फल चारि ॥ बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौं पवन-कुमार । बल बुधि बिद्या देहु मोहिं हरहु कलेस बिकार ॥ ॥ चौपाई ॥ जय हनुमान ज्ञान गुन सागर । जय कपीस तिहुँ लोक उजागर ॥१॥ रामदूत अतुलित बल धामा । अंजनि-पुत्र पवनसुत नामा ॥२॥ महाबीर बिक्रम बजरंगी । कुमति निवार सुमति के संगी ॥३॥ कंचन बरन बिराज सुबेसा । कानन कुंडल कुंचित केसा ॥४॥ हाथ बज्र औ ध्वजा बिराजै । काँधे मूँज जनेऊ साजै ॥५॥ संकर सुवन केसरीनंदन । तेज प्रताप महा जग बन्दन ॥६॥ बिद्यावान गुनी अति चातुर । राम काज करिबे को आतुर ॥७॥ प्रभु चरित्र सुनिबे को रसिया । राम लखन सीता मन बसिया ॥८॥ सूक्ष्म रूप धरि सियहिं दिखावा । बिकट रूप धरि लंक जरावा ॥९॥ भीम रूप धरि असुर संहारे । रामचंद्र के काज संवारे ॥१०॥ लाय संजीवन लखन जियाये । श्रीरघुबीर हरषि उर लाये ॥११॥ रघुपति कीन्ही बहुत बड़ाई । तुम मम प्रिय भरतहि सम भाई ॥१२॥ सहस बदन तुम्हरो जस गावैं । अस कहि श्रीपति कंठ लगावैं ॥१३॥ सनकादिक ब्रह्मादि मुनीसा । नारद सारद सहित अहीसा ॥१४॥ जम कुबेर दिगपाल जहाँ ते । कबि कोबिद कहि सके कहाँ ते ॥१५॥ तुम उपकार सुग्रीवहिं कीन्हा । राम मिलाय राज पद दीन्हा ॥१६॥ तुम्हरो मंत्र बिभीषन माना । लंकेस्वर भए सब जग जाना ॥१७॥ जुग सहस्र जोजन पर भानू । लील्यो ताहि मधुर फल जानू ॥१८॥ प्रभु मुद्रिका मेलि मुख माहीं । जलधि लाँघि गये अचरज नाहीं ॥१९॥ दुर्गम काज जगत के जेते । सुगम अनुग्रह तुम्हरे तेते ॥२०॥ राम दुआरे तुम रखवारे । होत न आज्ञा बिनु पैसारे ॥२१॥ सब सुख लहै तुम्हारी सरना । तुम रक्षक काहू को डर ना ॥२२॥ आपन तेज सम्हारो आपै । तीनों लोक हाँक तें काँपै ॥२३॥ भूत पिसाच निकट नहिं आवै । महाबीर जब नाम सुनावै ॥२४॥ नासै रोग हरै सब पीरा । जपत निरंतर हनुमत बीरा ॥२५॥ संकट तें हनुमान छुड़ावै । मन क्रम बचन ध्यान जो लावै ॥२६॥ सब पर राम तपस्वी राजा । तिन के काज सकल तुम साजा ॥२७॥ और मनोरथ जो कोई लावै । सोई अमित जीवन फल पावै ॥२८॥ चारों जुग परताप तुम्हारा । है परसिद्ध जगत उजियारा ॥२९॥ साधु-संत के तुम रखवारे । असुर निकंदन राम दुलारे ॥३०॥ अष्ट सिद्धि नौ निधि के दाता । अस बर दीन जानकी माता ॥३१॥ राम रसायन तुम्हरे पासा । सदा रहो रघुपति के दासा ॥३२॥ तुम्हरे भजन राम को पावै । जनम-जनम के दुख बिसरावै ॥३३॥ अन्तकाल रघुबर पुर जाई । जहाँ जन्म हरि-भक्त कहाई ॥३४॥ और देवता चित्त न धरई । हनुमत सेइ सर्ब सुख करई ॥३५॥ संकट कटै मिटै सब पीरा । जो सुमिरै हनुमत बलबीरा ॥३६॥ जै जै जै हनुमान गोसाईं । कृपा करहु गुरुदेव की नाईं ॥३७॥ जो सत बार पाठ कर कोई । छूटहि बंदि महा सुख होई ॥३८॥ जो यह पढ़ै हनुमान चलीसा । होय सिद्धि साखी गौरीसा ॥३९॥ तुलसीदास सदा हरि चेरा । कीजै नाथ हृदय मँह डेरा ॥४०॥ ॥ दोहा ॥ पवनतनय संकट हरन मंगल मूरति रूप । राम लखन सीता सहित हृदय बसहु सुर भूप ॥

श्री भीमरूपी स्तोत्र (मारुती स्तोत्र) · स्तोत्र

भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती । वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ॥१॥ महाबळी प्राणदाता सकळां उठवीं बळें । सौख्यकारी शोकहर्ता दूत वैष्णव गायका ॥२॥ दिनानाथा हरीरूपा सुंदरा जगदंतरा । पाताळ देवता हंता भव्य सिंदूर लेपना ॥३॥ लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना । पुण्यवंता पुण्यशीला पावना परतोषका ॥४॥ ध्वजांगे उचली बाहू आवेशें लोटिला पुढें । काळाग्नी काळरुद्राग्नी देखतां कांपती भयें ॥५॥ ब्रह्मांड माईला नेणों आवळें दंतपंगती । नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भृकुटी त्राहिटिल्या बळें ॥६॥ पुच्छ तें मुरडिलें माथां किरीटी कुंडलें बरीं । सुवर्णकटीकासोटी घंटा किंकिणी नागरा ॥७॥ ठकारे पर्वताऐसा नेटका सडपातळू । चपळांग पाहतां मोठें महाविद्युल्लतेपरी ॥८॥ कोटिच्या कोटि उड्डाणें झेपावे उत्तरेकडे । मंद्राद्रीसारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळें ॥९॥ आणिता मागुता नेला गेला आला मनोगती । मनासी टाकिलें मागें गतीस तूळणा नसे ॥१०॥ अणूपासोनि ब्रह्मांडा येवढा होत जातसे । तयासी तुळणा कोठें मेरुमंदार धाकुटें ॥११॥ ब्रह्मांडाभोंवते वेढे वज्रपुच्छ घालूं शके । तयासि तूळणा कैचीं ब्रह्मांडीं पाहतां नसे ॥१२॥ आरक्त देखिलें डोळां गिळीलें सूर्यमंडळा । वाढतां वाढतां वाढे भेदिलें शून्यमंडळा ॥१३॥ धनधान्यपशुवृद्धी पुत्रपौत्र समग्रही । पावती रूपविद्यादी स्तोत्र पाठें करूनियां ॥१४॥ भूतप्रेतसमंधादी रोगव्याधी समस्तही । नासती तूटती चिंता आनंदें भीमदर्शनें ॥१५॥ हे धरा पंधराश्लोकी लाभली शोभली बरी । दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकळागुणें ॥१६॥ रामदासी अग्रगण्यू कपिकुळासी मंडण । रामरूपी अंतरात्मा दर्शनें दोष नासती ॥१७॥ ॥ इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णम् ॥

श्री गायत्री मंत्र

गायत्री मंत्र · मंत्र

ॐ भूर्भुवः स्वः । तत्सवितुर्वरेण्यं । भर्गो देवस्य धीमहि । धियो यो नः प्रचोदयात् ॥

श्री विष्णु

श्री विष्णुसहस्रनाम · स्तोत्र

॥ श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्रम् ॥ हरिः ॐ । ॐ विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्यभवत्प्रभुः । भूतकृद्भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः ॥ १ ॥ पूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमा गतिः । अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षर एव च ॥ २ ॥ योगो योगविदां नेता प्रधानपुरुषेश्वरः । नारसिंहवपुः श्रीमान् केशवः पुरुषोत्तमः ॥ ३ ॥ सर्वः शर्वः शिवः स्थाणुर्भूतादिर्निधिरव्ययः । सम्भवो भावनो भर्ता प्रभवः प्रभुरीश्वरः ॥ ४ ॥ स्वयम्भूः शम्भुरादित्यः पुष्कराक्षो महास्वनः । अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः ॥ ५ ॥ अप्रमेयो हृषीकेशः पद्मनाभोऽमरप्रभुः । विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्ठः स्थविरो ध्रुवः ॥ ६ ॥ अग्राह्यः शाश्वतः कृष्णो लोहिताक्षः प्रतर्दनः । प्रभूतस्त्रिककुब्धाम पवित्रं मङ्गलं परम् ॥ ७ ॥ ईशानः प्राणदः प्राणो ज्येष्ठः श्रेष्ठः प्रजापतिः । हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः ॥ ८ ॥ ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमः क्रमः । अनुत्तमो दुराधर्षः कृतज्ञः कृतिरात्मवान् ॥ ९ ॥ सुरेशः शरणं शर्म विश्वरेताः प्रजाभवः । अहः संवत्सरो व्यालः प्रत्ययः सर्वदर्शनः ॥ १० ॥ अजः सर्वेश्वरः सिद्धः सिद्धिः सर्वादिरच्युतः । वृषाकपिरमेयात्मा सर्वयोगविनिःसृतः ॥ ११ ॥ वसुर्वसुमनाः सत्यः समात्माऽसम्मितः समः । अमोघः पुण्डरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः ॥ १२ ॥ रुद्रो बहुशिरा बभ्रुर्विश्वयोनिः शुचिश्रवाः । अमृतः शाश्वतस्थाणुर्वरारोहो महातपाः ॥ १३ ॥ सर्वगः सर्वविद्भानुर्विष्वक्सेनो जनार्दनः । वेदो वेदविदव्यङ्गो वेदाङ्गो वेदवित् कविः ॥ १४ ॥ लोकाध्यक्षः सुराध्यक्षो धर्माध्यक्षः कृताकृतः । चतुरात्मा चतुर्व्यूहश्चतुर्दंष्ट्रश्चतुर्भुजः ॥ १५ ॥ भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः । अनघो विजयो जेता विश्वयोनिः पुनर्वसुः ॥ १६ ॥ उपेन्द्रो वामनः प्रांशुरमोघः शुचिरूर्जितः । अतीन्द्रः सङ्ग्रहः सर्गो धृतात्मा नियमो यमः ॥ १७ ॥ वेद्यो वैद्यः सदायोगी वीरहा माधवो मधुः । अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबलः ॥ १८ ॥ महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः । अनिर्देश्यवपुः श्रीमानमेयात्मा महाद्रिधृक् ॥ १९ ॥ महेष्वासो महीभर्ता श्रीनिवासः सतां गतिः । अनिरुद्धः सुरानन्दो गोविन्दो गोविदां पतिः ॥ २० ॥ मरीचिर्दमनो हंसः सुपर्णो भुजगोत्तमः । हिरण्यनाभः सुतपाः पद्मनाभः प्रजापतिः ॥ २१ ॥ अमृत्युः सर्वदृक् सिंहः सन्धाता सन्धिमान् स्थिरः । अजो दुर्मर्षणः शास्ता विश्रुतात्मा सुरारिहा ॥ २२ ॥ गुरुर्गुरुतमो धाम सत्यः सत्यपराक्रमः । निमिषोऽनिमिषः स्रग्वी वाचस्पतिरुदारधीः ॥ २३ ॥ अग्रणीर्ग्रामणीः श्रीमान् न्यायो नेता समीरणः । सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्षः सहस्रपात् ॥ २४ ॥ आवर्तनो निवृत्तात्मा संवृतः सम्प्रमर्दनः । अहः संवर्तको वह्निरनिलो धरणीधरः ॥ २५ ॥ सुप्रसादः प्रसन्नात्मा विश्वधृग्विश्वभुग्विभुः । सत्कर्ता सत्कृतः साधुर्जह्नुर्नारायणो नरः ॥ २६ ॥ असङ्ख्येयोऽप्रमेयात्मा विशिष्टः शिष्टकृच्छुचिः । सिद्धार्थः सिद्धसङ्कल्पः सिद्धिदः सिद्धिसाधनः ॥ २७ ॥ वृषाही वृषभो विष्णुर्वृषपर्वा वृषोदरः । वर्धनो वर्धमानश्च विविक्तः श्रुतिसागरः ॥ २८ ॥ सुभुजो दुर्धरो वाग्मी महेन्द्रो वसुदो वसुः । नैकरूपो बृहद्रूपः शिपिविष्टः प्रकाशनः ॥ २९ ॥ ओजस्तेजोद्युतिधरः प्रकाशात्मा प्रतापनः । ऋद्धः स्पष्टाक्षरो मन्त्रश्चन्द्रांशुर्भास्करद्युतिः ॥ ३० ॥ अमृतांशूद्भवो भानुः शशबिन्दुः सुरेश्वरः । औषधं जगतः सेतुः सत्यधर्मपराक्रमः ॥ ३१ ॥ भूतभव्यभवन्नाथः पवनः पावनोऽनलः । कामहा कामकृत्कान्तः कामः कामप्रदः प्रभुः ॥ ३२ ॥ युगादिकृद्युगावर्तो नैकमायो महाशनः । अदृश्यो व्यक्तरूपश्च सहस्रजिदनन्तजित् ॥ ३३ ॥ इष्टोऽविशिष्टः शिष्टेष्टः शिखण्डी नहुषो वृषः । क्रोधहा क्रोधकृत्कर्ता विश्वबाहुर्महीधरः ॥ ३४ ॥ अच्युतः प्रथितः प्राणः प्राणदो वासवानुजः । अपांनिधिरधिष्ठानमप्रमत्तः प्रतिष्ठितः ॥ ३५ ॥ स्कन्दः स्कन्दधरो धुर्यो वरदो वायुवाहनः । वासुदेवो बृहद्भानुरादिदेवः पुरन्दरः ॥ ३६ ॥ अशोकस्तारणस्तारः शूरः शौरिर्जनेश्वरः । अनुकूलः शतावर्तः पद्मी पद्मनिभेक्षणः ॥ ३७ ॥ पद्मनाभोऽरविन्दाक्षः पद्मगर्भः शरीरभृत् । महर्द्धिरृद्धो वृद्धात्मा महाक्षो गरुडध्वजः ॥ ३८ ॥ अतुलः शरभो भीमः समयज्ञो हविर्हरिः । सर्वलक्षणलक्षण्यो लक्ष्मीवान् समितिञ्जयः ॥ ३९ ॥ विक्षरो रोहितो मार्गो हेतुर्दामोदरः सहः । महीधरो महाभागो वेगवानमिताशनः ॥ ४० ॥ उद्भवः क्षोभणो देवः श्रीगर्भः परमेश्वरः । करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो गुहः ॥ ४१ ॥ व्यवसायो व्यवस्थानः संस्थानः स्थानदो ध्रुवः । परर्द्धिः परमस्पष्टस्तुष्टः पुष्टः शुभेक्षणः ॥ ४२ ॥ रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयोऽनयः । वीरः शक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः ॥ ४३ ॥ वैकुण्ठः पुरुषः प्राणः प्राणदः प्रणवः पृथुः । हिरण्यगर्भः शत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजः ॥ ४४ ॥ ऋतुः सुदर्शनः कालः परमेष्ठी परिग्रहः । उग्रः संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः ॥ ४५ ॥ विस्तारः स्थावरस्थाणुः प्रमाणं बीजमव्ययम् । अर्थोऽनर्थो महाकोशो महाभोगो महाधनः ॥ ४६ ॥ अनिर्विण्णः स्थविष्ठोऽभूर्धर्मयूपो महामखः । नक्षत्रनेमिर्नक्षत्री क्षमः क्षामः समीहनः ॥ ४७ ॥ यज्ञ इज्यो महेज्यश्च क्रतुः सत्रं सतां गतिः । सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमम् ॥ ४८ ॥ सुव्रतः सुमुखः सूक्ष्मः सुघोषः सुखदः सुहृत् । मनोहरो जितक्रोधो वीरबाहुर्विदारणः ॥ ४९ ॥ स्वापनः स्ववशो व्यापी नैकात्मा नैककर्मकृत् । वत्सरो वत्सलो वत्सी रत्नगर्भो धनेश्वरः ॥ ५० ॥ धर्मगुब्धर्मकृद्धर्मी सदसत्क्षरमक्षरम् । अविज्ञाता सहस्रांशुर्विधाता कृतलक्षणः ॥ ५१ ॥ गभस्तिनेमिः सत्त्वस्थः सिंहो भूतमहेश्वरः । आदिदेवो महादेवो देवेशो देवभृद्गुरुः ॥ ५२ ॥ उत्तरो गोपतिर्गोप्ता ज्ञानगम्यः पुरातनः । शरीरभूतभृद्भोक्ता कपीन्द्रो भूरिदक्षिणः ॥ ५३ ॥ सोमपोऽमृतपः सोमः पुरुजित्पुरुसत्तमः । विनयो जयः सत्यसन्धो दाशार्हः सात्वताम्पतिः ॥ ५४ ॥ जीवो विनयिता साक्षी मुकुन्दोऽमितविक्रमः । अम्भोनिधिरनन्तात्मा महोदधिशयोऽन्तकः ॥ ५५ ॥ अजो महार्हः स्वाभाव्यो जितामित्रः प्रमोदनः । आनन्दो नन्दनो नन्दः सत्यधर्मा त्रिविक्रमः ॥ ५६ ॥ महर्षिः कपिलाचार्यः कृतज्ञो मेदिनीपतिः । त्रिपदस्त्रिदशाध्यक्षो महाश‍ृङ्गः कृतान्तकृत् ॥ ५७ ॥ महावराहो गोविन्दः सुषेणः कनकाङ्गदी । गुह्यो गभीरो गहनो गुप्तश्चक्रगदाधरः ॥ ५८ ॥ वेधाः स्वाङ्गोऽजितः कृष्णो दृढः सङ्कर्षणोऽच्युतः । वरुणो वारुणो वृक्षः पुष्कराक्षो महामनाः ॥ ५९ ॥ भगवान् भगहाऽऽनन्दी वनमाली हलायुधः । आदित्यो ज्योतिरादित्यः सहिष्णुर्गतिसत्तमः ॥ ६० ॥ सुधन्वा खण्डपरशुर्दारुणो द्रविणप्रदः । दिवस्पृक् सर्वदृग्व्यासो वाचस्पतिरयोनिजः ॥ ६१ ॥ त्रिसामा सामगः साम निर्वाणं भेषजं भिषक् । संन्यासकृच्छमः शान्तो निष्ठा शान्तिः परायणम् ॥ ६२ ॥ शुभाङ्गः शान्तिदः स्रष्टा कुमुदः कुवलेशयः । गोहितो गोपतिर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रियः ॥ ६३ ॥ अनिवर्ती निवृत्तात्मा सङ्क्षेप्ता क्षेमकृच्छिवः । श्रीवत्सवक्षाः श्रीवासः श्रीपतिः श्रीमतांवरः ॥ ६४ ॥ श्रीदः श्रीशः श्रीनिवासः श्रीनिधिः श्रीविभावनः । श्रीधरः श्रीकरः श्रेयः श्रीमाँल्लोकत्रयाश्रयः ॥ ६५ ॥ स्वक्षः स्वङ्गः शतानन्दो नन्दिर्ज्योतिर्गणेश्वरः । विजितात्माऽविधेयात्मा सत्कीर्तिश्छिन्नसंशयः ॥ ६६ ॥ उदीर्णः सर्वतश्चक्षुरनीशः शाश्वतस्थिरः । भूशयो भूषणो भूतिर्विशोकः शोकनाशनः ॥ ६७ ॥ अर्चिष्मानर्चितः कुम्भो विशुद्धात्मा विशोधनः । अनिरुद्धोऽप्रतिरथः प्रद्युम्नोऽमितविक्रमः ॥ ६८ ॥ कालनेमिनिहा वीरः शौरिः शूरजनेश्वरः । त्रिलोकात्मा त्रिलोकेशः केशवः केशिहा हरिः ॥ ६९ ॥ कामदेवः कामपालः कामी कान्तः कृतागमः । अनिर्देश्यवपुर्विष्णुर्वीरोऽनन्तो धनञ्जयः ॥ ७० ॥ ब्रह्मण्यो ब्रह्मकृद् ब्रह्मा ब्रह्म ब्रह्मविवर्धनः । ब्रह्मविद् ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रियः ॥ ७१ ॥ महाक्रमो महाकर्मा महातेजा महोरगः । महाक्रतुर्महायज्वा महायज्ञो महाहविः ॥ ७२ ॥ स्तव्यः स्तवप्रियः स्तोत्रं स्तुतिः स्तोता रणप्रियः । पूर्णः पूरयिता पुण्यः पुण्यकीर्तिरनामयः ॥ ७३ ॥ मनोजवस्तीर्थकरो वसुरेता वसुप्रदः । वसुप्रदो वासुदेवो वसुर्वसुमना हविः ॥ ७४ ॥ सद्गतिः सत्कृतिः सत्ता सद्भूतिः सत्परायणः । शूरसेनो यदुश्रेष्ठः सन्निवासः सुयामुनः ॥ ७५ ॥ भूतावासो वासुदेवः सर्वासुनिलयोऽनलः । दर्पहा दर्पदो दृप्तो दुर्धरोऽथापराजितः ॥ ७६ ॥ विश्वमूर्तिर्महामूर्तिर्दीप्तमूर्तिरमूर्तिमान् । अनेकमूर्तिरव्यक्तः शतमूर्तिः शताननः ॥ ७७ ॥ एको नैकः सवः कः किं यत् तत्पदमनुत्तमम् । लोकबन्धुर्लोकनाथो माधवो भक्तवत्सलः ॥ ७८ ॥ सुवर्णवर्णो हेमाङ्गो वराङ्गश्चन्दनाङ्गदी । वीरहा विषमः शून्यो घृताशीरचलश्चलः ॥ ७९ ॥ अमानी मानदो मान्यो लोकस्वामी त्रिलोकधृक् । सुमेधा मेधजो धन्यः सत्यमेधा धराधरः ॥ ८० ॥ तेजोवृषो द्युतिधरः सर्वशस्त्रभृतां वरः । प्रग्रहो निग्रहो व्यग्रो नैकश‍ृङ्गो गदाग्रजः ॥ ८१ ॥ चतुर्मूर्तिश्चतुर्बाहुश्चतुर्व्यूहश्चतुर्गतिः । चतुरात्मा चतुर्भावश्चतुर्वेदविदेकपात् ॥ ८२ ॥ समावर्तोऽनिवृत्तात्मा दुर्जयो दुरतिक्रमः । दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावासो दुरारिहा ॥ ८३ ॥ शुभाङ्गो लोकसारङ्गः सुतन्तुस्तन्तुवर्धनः । इन्द्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतागमः ॥ ८४ ॥ उद्भवः सुन्दरः सुन्दो रत्ननाभः सुलोचनः । अर्को वाजसनः श‍ृङ्गी जयन्तः सर्वविज्जयी ॥ ८५ ॥ सुवर्णबिन्दुरक्षोभ्यः सर्ववागीश्वरेश्वरः । महाह्रदो महागर्तो महाभूतो महानिधिः ॥ ८६ ॥ कुमुदः कुन्दरः कुन्दः पर्जन्यः पावनोऽनिलः । अमृताशोऽमृतवपुः सर्वज्ञः सर्वतोमुखः ॥ ८७ ॥ सुलभः सुव्रतः सिद्धः शत्रुजिच्छत्रुतापनः । न्यग्रोधोऽदुम्बरोऽश्वत्थश्चाणूरान्ध्रनिषूदनः ॥ ८८ ॥ सहस्रार्चिः सप्तजिह्वः सप्तैधाः सप्तवाहनः । अमूर्तिरनघोऽचिन्त्यो भयकृद्भयनाशनः ॥ ८९ ॥ अणुर्बृहत्कृशः स्थूलो गुणभृन्निर्गुणो महान् । अधृतः स्वधृतः स्वास्यः प्राग्वंशो वंशवर्धनः ॥ ९० ॥ भारभृत् कथितो योगी योगीशः सर्वकामदः । आश्रमः श्रमणः क्षामः सुपर्णो वायुवाहनः ॥ ९१ ॥ धनुर्धरो धनुर्वेदो दण्डो दमयिता दमः । अपराजितः सर्वसहो नियन्ताऽनियमोऽयमः ॥ ९२ ॥ सत्त्ववान् सात्त्विकः सत्यः सत्यधर्मपरायणः । अभिप्रायः प्रियार्होऽर्हः प्रियकृत् प्रीतिवर्धनः ॥ ९३ ॥ विहायसगतिर्ज्योतिः सुरुचिर्हुतभुग्विभुः । रविर्विरोचनः सूर्यः सविता रविलोचनः ॥ ९४ ॥ अनन्तो हुतभुग्भोक्ता सुखदो नैकजोऽग्रजः । अनिर्विण्णः सदामर्षी लोकाधिष्ठानमद्भुतः ॥ ९५ ॥ सनात्सनातनतमः कपिलः कपिरव्ययः । स्वस्तिदः स्वस्तिकृत्स्वस्ति स्वस्तिभुक्स्वस्तिदक्षिणः ॥ ९६ ॥ अरौद्रः कुण्डली चक्री विक्रम्यूर्जितशासनः । शब्दातिगः शब्दसहः शिशिरः शर्वरीकरः ॥ ९७ ॥ अक्रूरः पेशलो दक्षो दक्षिणः क्षमिणांवरः । विद्वत्तमो वीतभयः पुण्यश्रवणकीर्तनः ॥ ९८ ॥ उत्तारणो दुष्कृतिहा पुण्यो दुःस्वप्ननाशनः । वीरहा रक्षणः सन्तो जीवनः पर्यवस्थितः ॥ ९९ ॥ अनन्तरूपोऽनन्तश्रीर्जितमन्युर्भयापहः । चतुरश्रो गभीरात्मा विदिशो व्यादिशो दिशः ॥ १०० ॥ अनादिर्भूर्भुवो लक्ष्मीः सुवीरो रुचिराङ्गदः । जननो जनजन्मादिर्भीमो भीमपराक्रमः ॥ १०१ ॥ आधारनिलयोऽधाता पुष्पहासः प्रजागरः । ऊर्ध्वगः सत्पथाचारः प्राणदः प्रणवः पणः ॥ १०२ ॥ प्रमाणं प्राणनिलयः प्राणभृत्प्राणजीवनः । तत्त्वं तत्त्वविदेकात्मा जन्ममृत्युजरातिगः ॥ १०३ ॥ भूर्भुवःस्वस्तरुस्तारः सविता प्रपितामहः । यज्ञो यज्ञपतिर्यज्वा यज्ञाङ्गो यज्ञवाहनः ॥ १०४ ॥ यज्ञभृद् यज्ञकृद् यज्ञी यज्ञभुग् यज्ञसाधनः । यज्ञान्तकृद् यज्ञगुह्यमन्नमन्नाद एव च ॥ १०५ ॥ आत्मयोनिः स्वयञ्जातो वैखानः सामगायनः । देवकीनन्दनः स्रष्टा क्षितीशः पापनाशनः ॥ १०६ ॥ शङ्खभृन्नन्दकी चक्री शार्ङ्गधन्वा गदाधरः । रथाङ्गपाणिरक्षोभ्यः सर्वप्रहरणायुधः ॥ १०७ ॥ सर्वप्रहरणायुध ॐ नम इति । वनमाली गदी शार्ङ्गी शङ्खी चक्री च नन्दकी । श्रीमान् नारायणो विष्णुर्वासुदेवोऽभिरक्षतु ॥ १०८ ॥ ॥ फलश्रुति ॥ इतीदं कीर्तनीयस्य केशवस्य महात्मनः । नाम्नां सहस्रं दिव्यानामशेषेण प्रकीर्तितम् ॥ १ ॥ य इदं श‍ृणुयान्नित्यं यश्चापि परिकीर्तयेत् । नाशुभं प्राप्नुयात्किञ्चित्सोऽमुत्रेह च मानवः ॥ २ ॥ वेदान्तगो ब्राह्मणः स्यात्क्षत्रियो विजयी भवेत् । वैश्यो धनसमृद्धः स्याच्छूद्रः सुखमवाप्नुयात् ॥ ३ ॥ धर्मार्थी प्राप्नुयाद्धर्ममर्थार्थी चार्थमाप्नुयात् । कामानवाप्नुयात्कामी प्रजार्थी प्राप्नुयात्प्रजाम् ॥ ४ ॥ भक्तिमान् यः सदोत्थाय शुचिस्तद्गतमानसः । सहस्रं वासुदेवस्य नाम्नामेतत्प्रकीर्तयेत् ॥ ५ ॥ यशः प्राप्नोति विपुलं ज्ञातिप्राधान्यमेव च । अचलां श्रियमाप्नोति श्रेयः प्राप्नोत्यनुत्तमम् ॥ ६ ॥ न भयं क्वचिदाप्नोति वीर्यं तेजश्च विन्दति । भवत्यरोगो द्युतिमान्बलरूपगुणान्वितः ॥ ७ ॥ रोगार्तो मुच्यते रोगाद्बद्धो मुच्येत बन्धनात् । भयान्मुच्येत भीतस्तु मुच्येतापन्न आपदः ॥ ८ ॥ दुर्गाण्यतितरत्याशु पुरुषः पुरुषोत्तमम् । स्तुवन्नामसहस्रेण नित्यं भक्तिसमन्वितः ॥ ९ ॥ वासुदेवाश्रयो मर्त्यो वासुदेवपरायणः । सर्वपापविशुद्धात्मा याति ब्रह्म सनातनम् ॥ १० ॥ न वासुदेवभक्तानामशुभं विद्यते क्वचित् । जन्ममृत्युजराव्याधिभयं नैवोपजायते ॥ ११ ॥ इमं स्तवमधीयानः श्रद्धाभक्तिसमन्वितः । युज्येतात्मसुखक्षान्तिश्रीधृतिस्मृतिकीर्तिभिः ॥ १२ ॥ न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभा मतिः । भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां पुरुषोत्तमे ॥ १३ ॥ द्यौः सचन्द्रार्कनक्षत्रा खं दिशो भूर्महोदधिः । वासुदेवस्य वीर्येण विधृतानि महात्मनः ॥ १४ ॥ ससुरासुरगन्धर्वं सयक्षोरगराक्षसम् । जगद्वशे वर्ततेदं कृष्णस्य सचराचरम् ॥ १५ ॥ इन्द्रियाणि मनो बुद्धिः सत्त्वं तेजो बलं धृतिः । वासुदेवात्मकान्याहुः क्षेत्रं क्षेत्रज्ञ एव च ॥ १६ ॥ सर्वागमानामाचारः प्रथमं परिकल्प्यते । आचारप्रभवो धर्मो धर्मस्य प्रभुरच्युतः ॥ १७ ॥ ऋषयः पितरो देवा महाभूतानि धातवः । जङ्गमाजङ्गमं चेदं जगन्नारायणोद्भवम् ॥ १८ ॥ योगो ज्ञानं तथा साङ्ख्यं विद्याः शिल्पादिकर्म च । वेदाः शास्त्राणि विज्ञानमेतत्सर्वं जनार्दनात् ॥ १९ ॥ एको विष्णुर्महद्भूतं पृथग्भूतान्यनेकशः । त्रींल्लोकान्व्याप्य भूतात्मा भुङ्क्ते विश्वभुगव्ययः ॥ २० ॥ इमं स्तवं भगवतो विष्णोर्व्यासेन कीर्तितम् । पठेद्य इच्छेत्पुरुषः श्रेयः प्राप्तुं सुखानि च ॥ २१ ॥ विश्वेश्वरमजं देवं जगतः प्रभुमव्ययम् । भजन्ति ये पुष्कराक्षं न ते यान्ति पराभवम् ॥ २२ ॥ ॥ इति श्रीविष्णोर्दिव्यसहस्रनामस्तोत्रं सम्पूर्णम् ॥

श्री सत्यनारायणाची आरती · आरती

जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा ॥ पंचारति ओवाळूं श्रीपति तुज भक्तिभावा ॥ धृ ॥ विधियुक्त पूजुनी करिती पुराण श्रवण ॥ परिमलद्रव्यांसहित पुष्पमाळा अर्पून ॥ घृतयुक्तशर्करामिश्रित गोधूमचूर्ण ॥ प्रसाद भक्षण करितां तूं त्यां प्रसन्न नारायण ॥ जय० ॥ १ ॥ शतानंदे विप्रें पूर्वी व्रत हें आचरिलें ॥ दरिद्र दवडुनि अंतीं त्यातें मोक्षपदा नेलें ॥ त्यापासुनि हें व्रत या कलियुगीं सकळां श्रुत झालें ॥ भावार्थें पूजितां सर्वां इच्छित लाधलें ॥ जय० ॥ २ ॥ साधुवैश्यें संततिसाठीं तुजला प्रार्थियलें ॥ इच्छित पुरतां मदांध होऊनि व्रत न आचरिलें ॥ त्या पापानें संकटिं पडुनी दुःखहि भोगीलें ॥ स्मृति हो‍उनि आचरितां व्रत त्या तुवांचि उद्ध्रिलें ॥ जय० ॥ ३ ॥ प्रसाद विसरुनि पतिभेटीला कलावती गेली ॥ क्षोभ तुझा होतांचि तयाची नौका बुडाली ॥ अंगध्वजरायासी यापरि दुःखस्थिति आली ॥ मृतवार्ता शतपुत्रांची सत्वर कर्णीं परिसीली ॥ जय० ॥ ४ ॥ पुनरपि पूजुनि प्रसाद ग्रहण करितां तत्क्षणीं ॥ पतिची नौका तरली देखे कलावती नयनीं ॥ अंगध्वजरायासी पुत्र भेटति येऊनि ॥ ऐसा भक्तां संकटिं पावसी तूं चक्रपाणी ॥ जय० ॥ ५ ॥ अनन्यभावें पूजुनि हें व्रत जेजन आचरती ॥ इच्छित पुरविसि त्यांतें देउनि संतति संपत्ति ॥ संहरसी भवदुरितें सर्वहि बंधने तुटती ॥ राजा रंका समान मानुनि पावसि श्रीपती ॥ जय० ॥ ६ ॥ ऐसा तव व्रतमहिमा अपार वर्णूं मी कैसा । भक्तिपुरःसर आचरती त्यां पावसि जगदीशा । भक्तांचा कनवाळू कल्पद्रुम तूं सर्वेशा ॥ मोरेश्वरसुत वासुदेव तुज विनवी भवनाशा ॥ जय जय० ॥ ७ ॥

श्री कालभैरव

श्री कालभैरवाष्टक · स्तोत्र

॥ कालभैरवाष्टकम् ॥ ॐ देवराजसेव्यमानपावनांघ्रिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरम् । नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥ १ ॥ भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनम् । कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥ २ ॥ शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम् । भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥ ३ ॥ भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहम् । विनिक्वणन्मनोज्ञहेमकिङ्किणीलसत्कटिं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥ ४ ॥ धर्मसेतुपालकं त्वधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुम् । स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥ ५ ॥ रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुग्मकं नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनम् । मृत्युदर्पनाशनं करालदंष्ट्रमोक्षणं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥ ६ ॥ अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसन्ततिं दृष्टिपातनष्टपापजालमुग्रशासनम् । अष्टसिद्धिदायकं कपालमालिकन्धरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥ ७ ॥ भूतसङ्घनायकं विशालकीर्तिदायकं काशिवासलोकपुण्यपापशोधकं विभुम् । नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥ ८ ॥ कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनम् । शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं ते प्रयान्ति कालभैरवाङ्घ्रिसन्निधिं ध्रुवम् ॥ ९ ॥ ॥ इति श्रीमच्छङ्कराचार्यविरचितं कालभैरवाष्टकं सम्पूर्णम् ॥

श्री राम

श्री रामरक्षास्तोत्रम् · स्तोत्र

॥ ॐ श्रीगणेशाय नमः ॥ अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य । बुधकौशिक ऋषिः । श्रीसीतारामचन्द्रो देवता । अनुष्टुप् छन्दः । सीता शक्तिः । श्रीमद् हनुमान कीलकम् । श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे रामरक्षास्तोत्रजपे विनियोगः ॥ अथ ध्यानम् । ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम् । वामाङ्कारूढ सीतामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचन्द्रम् ॥ इति ध्यानम् ॥ चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् । एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥ १॥ ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम् । जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितम् ॥ २॥ सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तञ्चरान्तकम् । स्वलीलया जगत्त्रातुमाविर्भूतमजं विभुम् ॥ ३॥ रामरक्षां पठेत्प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम् । शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥ ४॥ कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती । घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥ ५॥ जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः । स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः ॥ ६॥ करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित् । मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥ ७॥ सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः । ऊरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत् ॥ ८॥ जानुनी सेतुकृत्पातु जङ्घे दशमुखान्तकः । पादौ बिभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः ॥ ९॥ एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् । स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् ॥ १०॥ पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः । न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ॥ ११॥ रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् । नरो न लिप्यते पापैः भुक्तिं मुक्तिं च विन्दति ॥ १२॥ जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम् । यः कण्ठे धारयेत्तस्य करस्थाः सर्वसिद्धयः ॥ १३॥ वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् । अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमङ्गलम् ॥ १४॥ आदिष्टवान् यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः । तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः ॥ १५॥ आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् । अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् स नः प्रभुः ॥ १६॥ तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ । पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ ॥ १७॥ फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ । पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥ १८॥ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् । रक्षः कुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघूत्तमौ ॥ १९॥ आत्तसज्जधनुषाविषुस्पृशावक्षयाशुगनिषङ्गसङ्गिनौ । रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः पथि सदैव गच्छताम् ॥ २०॥ सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा । गच्छन्मनोरथोऽस्माकं रामः पातु सलक्ष्मणः ॥ २१॥ रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बली । काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघूत्तमः ॥ २२॥ वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः । जानकीवल्लभः श्रीमान् अप्रमेय पराक्रमः ॥ २३॥ इत्येतानि जपन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः । अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः ॥ २४॥ रामं दूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससम् । स्तुवन्ति नामभिर्दिव्यैः न ते संसारिणो नराः ॥ २५॥ रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरम् । काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम् । राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिम् । वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम् ॥ २६॥ रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे । रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ॥ २७॥ श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम । श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम ॥ २८॥ श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि । श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये ॥ २९॥ माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः । सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालु- र्नान्यं जाने नैव जाने न जाने ॥ ३०॥ दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा । पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम् ॥ ३१॥ लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम् । कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रम् शरणं प्रपद्ये ॥ ३२॥ मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् । वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥ ३३॥ कूजन्तं रामरामेति मधुरं मधुराक्षरम् । आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् ॥ ३४॥ आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदाम् । लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ॥ ३५॥ भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदाम् । तर्जनं यमदूतानां रामरामेति गर्जनम् ॥ ३६॥ रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः । रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥ ३७॥ रामरामेति रामेति रमे रामे मनोरमे । (श्रीरामरामरामेति) सहस्रनामतत्तुल्यं रामनाम वरानने ॥ ३८॥ इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णम् ॥ ॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

शुभंकरोति

शुभंकरोति · श्लोक

शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा । शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोऽस्तुते । दिव्या दिव्या दिपत्कार कानी कुंडले मोतीहार । दिव्याला पाहून नमस्कार ॥ १ ॥ दिवा लावला देवांपाशी, उजेड पडला तुळशीपाशी । माझा नमस्कार सर्व देवांपाशी ॥ २ ॥ ये गे लक्ष्मी बैस गे बाजे, आमुचे घर तुला सारे । तिळाचे तेल कापसाची वात, दिवा जळो मध्यान्हात । घरातली इडापिडा बाहेर जावो बाहेरची लक्ष्मी घरात येवो । घरच्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो ॥ ३ ॥ दीपज्योति: परब्रह्म दीपज्योति: जनार्दन । दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोऽस्तुते ॥ ४ ॥ अधिराजा महाराजा वनराजा वनस्पति । इष्टदर्शनं इष्टान्नं शत्रूणांच पराभवम् । मुले तो ब्रह्मरुपाय मध्ये तो विष्णुरुपिण: । अग्रत: शिवरुपाय अश्वत्थाय नमो नम: ॥ ५ ॥

श्री तुळजाभवानी

श्री तुळजाभवानीची आरती · आरती

जय देवी तुळजाअंबाई । चंडमुंड वधुनिया महिषासुर वधुनिया । हे विलासी तुझे पाई ॥ वाघावर स्वार झाली हाती सोन्याचे गोट । बाजूबंध दंडा मधे ॥ जय देवी तुळजाअंबाई ॥ आई तुझ्या दरबारी लाख खंडी भर तेल । जैसे कोडी मधे ॥ जय देवी तुळजाअंबाई ॥ कवडयांचे गड़ी माड़ करिते भक्तांचा संभाड । तुडजापुरची माता भवानी । आरती करितो नेमाने ॥ जय देवी तुळजाभवानी । जय देवी तुळजाअंबाई ॥

श्री महालक्ष्मी

श्री महालक्ष्मीची आरती · आरती

जय देवी जय देवी जय महालक्ष्मी । वससी व्यापकरुपें तू स्थूलसूक्ष्मी ॥ धृ ॥ करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता । पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकांता । कमलाकारें जठरी जन्मविला धाता । सहस्रवदनीं भूधर न पुरे गुण गातां ॥ १ ॥ मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं । झळके हाटकवाटी पीयूषरसपाणी । माणिकरसना सुरंगवसना मृगनयनीं । शशिधरवदना राजस मदनाची जननी ॥ २ ॥ तारा शक्ति अगम्या शिवभजकां गौरी । सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारीं । गायत्री निजबीजा निगमागम सारी । प्रगटे पद्मावती निजधर्माचारी ॥ ३ ॥ अमृतभरिते सरिते अघदुरितें वारीं । मारी दुर्घट असुरां भवदुस्तर तारीं । वारी मायापटल प्रणमत परिवारी । हें रुप चिद्रूप दावी निर्धारी ॥ ४ ॥ चतुराननें कुश्चित कर्मांच्या ओळी । लिहिल्या असतिल माते माझे निजभाळी । पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी । मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी ॥ ५ ॥

श्री महालक्ष्मी अष्टक · स्तोत्र

इंद्र उवाच - नमस्तेस्तु महामाये, श्रीपीठे सुरपूजिते । शंखचक्रगदाहस्ते, महालक्ष्मी नमोस्तुते ॥ १ ॥ नमस्ते गरुडारूढे, कोलासुरभयंकरी । सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते ॥ २ ॥ सर्वज्ञे, सर्ववरदे, सर्वदुष्टभयंकरी । सर्वदु:खहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते ॥ ३ ॥ सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी । मंत्रमूर्ते सदा देवी, महालक्ष्मी नमोस्तुते ॥ ४ ॥ आद्यन्तरहिते देवी, आद्यशक्ति महेश्वरी । योगज्ञे योगसंभूते, महालक्ष्मी नमोस्तुते ॥ ५ ॥ स्थूलसुक्ष्महारौद्रे महाशक्ते महोदरे । महापापहरे देवी, महालक्ष्मी नमोस्तुते ॥ ६ ॥ पद्मासनस्थिते देवी, परब्रह्मस्वरूपिणी । परमेशि जगन्मातर्महालक्ष्मी नमोस्तुते ॥ ७ ॥ श्वेताम्बरधरे देवी, नानालंकारभूषिते । जगतस्थिते जगन्मातर्महालक्ष्मी नमोस्तुते ॥ ८ ॥ फलश्रृति - महालक्ष्म्यष्टकं स्तोत्रं यः पठेद्भक्तिमान्नरः । सर्वसिद्धिमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा ॥ १ ॥ एककाले पठेन्नित्यं महापाप विनाशनं । द्विकालं यः पठेन्नित्यं धनधान्यं समन्वितः ॥ २ ॥ त्रिकालं यः पठेन्नित्यं महाशत्रु विनाशनं । महालक्ष्मीर्भ्हवेन्नित्यं प्रसन्ना वरदा शुभा ॥ ३ ॥

श्री खंडोबा

श्री खंडोबाची आरती · आरती

जय देव जय देव जय शिव मार्तंडा । अरिमर्दन मल्हारी तूचि प्रचंडा ॥ धृ ॥ मणिमल्ल दैत्य प्रबल तो जाहला । त्रिभुवनी त्याने प्रलय मांडिला ॥ नाटोपे कोणास वरदे मातला । देवगण गंधर्व कापती त्याला ॥ जय देव० ॥ २ ॥ चंपाषष्ठी दिवशी अवतार धरिसी । मणिमल्ल दैत्यांचा संहार करिसी ॥ चरणी पृष्ठी खड्गे वर्मी स्थापिसी । अंती वर दे दैत्या मुक्ती पै देसी ॥ जय देव० ॥ ३ ॥ मणिमल्ल दैत्य नामे मल्हारी देवा । संकट पडले आहे जेजुरी ॥ अर्धांगी म्हाळसा शोभे सुंदरी । देवा ठाव मागे दास नरहरी ॥ जय देव० ॥ ४ ॥

श्री सरस्वती

सरस्वती वंदना · श्लोक

या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता । या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना । या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता । सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥ १ ॥ शुक्लां ब्रह्मविचार सार परमामाद्यां जगद्व्यापिनीं वीणा-पुस्तक-धारिणीमभयदां जाड्यान्धकारापहाम् । हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थिताम् वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम् ॥ २ ॥

श्री शनि

श्री शनि स्तोत्र (दशरथकृत) · स्तोत्र

नमः कृष्णाय नीलाय शिखिखण्डनिभाय च । नमो नीलमधूकाय नीलोत्पलनिभाय च ॥ १ ॥ नमो निर्मांसदेहाय दीर्घश्रुतिजटाय च । नमो विशालनेत्राय शुष्कोदर भयानक ॥ २ ॥ नमः पौरुषगात्राय स्थूलरोमाय ते नमः । नमो नित्यं क्षुधार्ताय नित्यतृप्ताय ते नमः ॥ ३ ॥ नमो घोराय रौद्राय भीषणाय करालिने । नमो दीर्घाय शुष्काय कालदंष्ट्र नमोऽस्तु ते ॥ ४ ॥ नमस्ते घोररूपाय दुर्निरीक्ष्याय ते नमः । नमस्ते सर्वभक्षाय वलीमुख नमोऽस्तु ते ॥ ५ ॥ सूर्यपुत्त्र नमस्तेऽस्तु भास्वरोभयदायिने । अधोदृष्टे नमस्तेऽस्तु संवर्तक नमोऽस्तु ते ॥ ६ ॥ नमो मन्दगते तुभ्यं निष्प्रभाय नमोनमः । तपसा ज्ञानदेहाय नित्ययोगरताय च ॥ ७ ॥ ज्ञानचक्षुर्नमस्तेऽस्तु काश्यपात्मजसूनवे । तुष्टो ददासि राज्यं त्वं क्रुद्धो हरसि तत्‍ क्षणात् ॥ ८ ॥ देवासुरमनुष्याश्च सिद्धविद्याधरोरगाः । त्वयावलोकितास्सौरे दैन्यमाशुव्रजन्तिते ॥ ९ ॥ ब्रह्मा शक्रोयमश्चैव मुनयः सप्ततारकाः । राज्यभ्रष्टाः पतन्तीह तव दृष्ट्याऽवलोकितः ॥ १० ॥ त्वयाऽवलोकितास्तेऽपि नाशं यान्ति समूलतः । प्रसादं कुरु मे सौरे प्रणत्वाहित्वमर्थितः ॥ ११ ॥

श्री गजानन महाराज

गण गण गणात बोते · मंत्र

॥ गण गण गणात बोते ॥

श्री गजानन महाराजांची आरती · आरती

जय जय सच्चित्स्वरूप स्वामी गणराया । अवतरलासी भूवर जड मूढ ताराया ॥ जयदेव जयदेव ॥ धृ ॥ निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी । स्थिरचर व्यापुन उरले जे या जगतासी । तें तूं खरोखर निःसंशय अससी । लीलामात्रें धरिलें मानव देहासी ॥ जयदेव जयदेव ॥ १ ॥ होऊं न देशी त्याची जाणिव तूं कवणा । करुनी गणि गण गणात बोते या भजना । धाता हरिहर गुरुवर तूंचि सुखसदना । जिकडे पहावे तिकडे तूं दिससी नयना ॥ जयदेव जयदेव ॥ २ ॥ लीला अनंत केल्या बंकटसदनास । पेटविले त्या अग्नीवांचुनि चिलमेस । क्षणांत आणिले जीवन निर्जल वापीस । केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश ॥ जयदेव जयदेव ॥ ३ ॥ व्याधि वारुन केले कैकां संपन्न । करविलें भक्तांलागी विठ्ठल दर्शन । भवसिंधु हा तरण्या नौका तव चरण । स्वामी दासगणूचे मान्य करा कवन ॥ जयदेव जयदेव ॥ ४ ॥

श्री साई बाबा

श्री साई मंत्र · मंत्र

ॐ साईं राम । ॐ शिर्डी वासाय विद्महे सच्चिदानंदाय धीमहि । तन्नो साईं प्रचोदयात् ॥