समर्थ दिनदर्शिकातुमच्या स्थानानुसार मराठी पंचांग

March 2026 महिना माहिती

Month Info — महाराष्ट्रासाठी

मास — Masa

फाल्गुन / चैत्र

शक संवत्सर — Shaka Year

1947 / 1948

💡 खुलासा

३ मार्च — खग्रास चंद्रग्रहण

३ मार्च २०२६ रोजी खग्रास चंद्रग्रहण आहे. मात्र महाराष्ट्रातून खग्रास अवस्था दिसत नाही; चंद्रोदय उशिरा झाल्यामुळे ग्रहणाचा शेवटचा खंडग्रास भागच थोड्या वेळासाठी दिसतो. त्यानंतर छायाकल्प अवस्था काही काळ सुरू राहते. त्यामुळे “खग्रास चंद्रग्रहण” ही जागतिक ग्रहणाची अवस्था आहे, तर आपल्या भागात दिसणारा भाग खंडग्रास स्वरूपाचा आहे.

गुढीपाडवा — क्षय प्रतिपदा

१९ मार्च २०२६ रोजी गुढीपाडवा आहे. यावर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदा ही क्षय तिथी आहे. १९ मार्चच्या सकाळी सुमारे ०६:५४ वाजता अमावास्या संपून प्रतिपदा सुरू होते आणि २० मार्चच्या पहाटे सुमारे ०४:५३ वाजता ती संपते. त्यामुळे प्रतिपदा कोणत्याही सूर्योदयाला व्यापत नाही; तरी तिच्या प्रत्यक्ष कालावधीतच १९ मार्चला गुढीपाडवा साजरा केला जातो. गुढी उभारणी प्रतिपदा सुरू झाल्यानंतर करावी. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस मानला जातो.